राज्यात उद्या पावसाचे वातावरण कसे ?  जाणून घ्या  एका क्लिकवर
राज्यात उद्या पावसाचे वातावरण कसे ? जाणून घ्या एका क्लिकवर
img
दैनिक भ्रमर
काळ पासून राज्यभरात पावसाने जोरदार कमबॅक केला असून हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना रेड, काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. दरम्यान, दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. उद्या पासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. जवळपास 27 तारखेपर्यंत राज्यात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. 

हवामान खात्याने 25 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. 25 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने अनेक ठिकाणी मुसळधार आणि ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.   पासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. जवळपास 27 तारखेपर्यंत राज्यात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.  

दरम्यान, हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व पाच जिल्ह्यांना आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांना येलो लाईट जारी करण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, रायगड, पुणेला 27 सप्टेंबरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group