थंडी अल्हाददायक वाटत असली तरी राज्यातून ती हळूहळू आपला गाशा गुंडाळत आहेत. वातावरणातील वाढते तापमान हे थंडी कमी होण्यास कारण ठरत आहे. वातावरण ढगाळ दिसत असले तरी गारवा कमी होत आहे.
राज्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानामध्ये वाढ होत आहे. राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गारठा कमी होत उकाडा वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यातील तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात आजही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील राज्यातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये सकाळच्या सुमारास गारठा आणि दाट धुके पाहायला मिळत आहे. तर दुपारी कडक ऊन आणि रात्री पुन्हा थंडी असे वातावरण झाले आहे.
राज्यात सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यात येत्या २४ तासांमध्ये किमान तापमानात २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज आकाश ढगाळ राहून विदर्भामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर उर्वरीत महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहिल. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
आग्नेय अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. उत्तर भारतात १५५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. उत्तरेकडील राज्यात दाट धुके आणि कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे.