गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात कमालीचे बदल पाहायला मिळाले. कधी गारठून टाकणारी थंडी, कधी अवकाळी पाऊस तर कधी दमात वातावरण त्यामुळे राज्यातील वातावरण काहीसे अस्थिर असल्यासायचे पाहायला मिळाले.
दरम्यान पुन्हा एकदा अनेक शहरांमधील थंडी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर पुण्यामध्ये मात्र थंडीचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल. राज्यातील किमान तापमानामध्ये देखील आता 2 ते 3 अंशांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पुण्यामध्ये थंडीचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये सकाळच्या वेळी काही धुके असण्याची शक्यता आहे. तसेच आकाश काहीसं ढगाळ असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस एवढे राहील.मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर मुंबईतील थंडीमध्ये काहीशी घट होणार आहे. मुंबई शहरात सकाळच्या वेळी दाट धुके पडणार असून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढे राहील.
मराठवाड्यातील थंडीचा जोर काहीसा कमी झाल्याचे पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 24 तासांमध्ये सकाळच्या वेळी काहीच धुके पाहायला मिळेल तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तसेच , उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. नाशिकमधील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहील तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. एकंदरीत राज्यातील किमान तापमानामध्ये 2 अंशापर्यंत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र पुण्यातील थंडीचा जोर हा दोन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केला आहे.