राज्यात पारा वेगाने वर चढत असून उष्णतेची लाट प्रत्येक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवार हा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. यामध्येच उष्माघातामुळे नांदेडमध्ये ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर १ मार्चपासून ते आतापर्यंत राज्यामध्ये उष्णाघाताचे ७७ रुग्ण आढळले आहेत.
अशातच राज्यात मंगळवारही सर्वात उष्ण दिवस ठरताना दिसत आहे. आज राज्यात कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये सर्वाधिक ४२अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
Accuweather या हवामानाबाबत माहिती देणाऱ्या वेबसाईटवर तापमानासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. Accuweather तापमानाची नोंद वेळेनुसार सतत बदलत असते. दुपारी 4 वाजता या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यातच राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती आहे तापमान, वाचा सविस्तर....
कोणत्या जिल्ह्यात किती आहे तापमान?
Accuweather या वेबसाईटवर राज्यभरातील जिल्ह्यातील तापमानाच्या नोंदी उपलब्ध आहेत. यानुसार, मुंबई ३६ अंश सेल्सियस, नवी मुंबई ३५, ठाणे ३९, पुणे ३५, पिंपरी चिंचवड ३८, अहमदनगर ३७, सोलापूर ४०, अमरावती ३८ , नागपूर ३८ आणि नाशिक 36 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
तसेच मुंबई आणि उपनगरीय भाग - अंधेरी पूर्व ३८, अंधेरी पश्चिम ३८, भांडुप पूर्व ३७, भांडुप पश्चिम ३७ आणि भिवंडी येथे ३७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यभरात तीव्र उष्णेतची लाट पसरली आहे आणि पुढील काही दिवशी अशीच परिस्थिती राहू शकते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.