नाशिक - नाशिकमध्ये आता किमान तापमान देखील वाढले असून तापमानामध्ये 2.3 अंश डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे. आज कमाल तापमान हे 37.5 डिग्री सेल्सिअसने वाढले आहे, यामध्ये देखील एक अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे आता नाशिककरांना मोठ्या उष्णतेचा सामना करावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिकमध्ये मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच तापमान 36 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेलो होते. पण मधल्या काळामध्ये उत्तरेकडून वाहणारे थंड वारे आणि नैसर्गिक बदल यामुळे तापमान पुन्हा एकदा खाली आले होते आता मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला असताना नाशिकचे तापमान पुन्हा एकदा वाढू लागले आहे.
सोमवारी कमाल तापमान 36.4 अंश डिग्री सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं होतं त्यानंतर मंगळवारी सकाळी किमान तापमान हे 18.9 अंश डिग्री सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आला आहे तापमानामध्ये 2.3 डिग्री सेल्सिअसने वाढ झाली असून मंगळवारी कमाल तापमान हे 37.5 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते यामध्ये देखील एक अंशाने वाढ झाली आहे.