नाशिक बाजार समित्यांमधील कांद्याचे आजचे दर, सरासरी मिळतोय 'इतका' बाजारभाव
नाशिक बाजार समित्यांमधील कांद्याचे आजचे दर, सरासरी मिळतोय 'इतका' बाजारभाव
img
Vaishnavi Sangale
१८ जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी ०५ वाजेपर्यंत दीड लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात जवळपास ०१ लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली. शुक्रवारी कांद्याला कमीत कमी ९५० पासून ते सरासरी १८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याचे बाजार भाव पाहिले असता लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी  १४०० रुपये, तसेच नाशिक बाजारात सरासरी बाजार घसरले असून केवळ ७५० रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारात सरासरी १४७५ रुपये, भुसावळ बाजारात १००० रुपये देवळा बाजारात १४०० रुपये, उमराणे बाजारात १२५० रुपये दर मिळाला. 

नाशिक जिल्ह्यातील आजचे (१९ जुलै) कांदा बाजारभाव 
नाशिक जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये वेगवेगळे आहेत. उमराणे येथे सरासरी भाव ₹१३५०/क्विंटल, देवळा येथे ₹१४२५/क्विंटल आणि लासलगाव (विंचूर) येथे ₹१४५०/क्विंटल आहे. नाशिक शहरात घाऊक बाजारात कांद्याचा भाव २६ ते ३० रुपये प्रति किलो आहे, असे 
 
काही प्रमुख बाजार समित्यांमधील कांद्याचे बाजारभाव 

उमराणे:  सरासरी भाव ₹१३५०/क्विंटल, कमीत कमी ₹१०००/क्विंटल, जास्तीत जास्त ₹१७५१/क्विंटल. 

देवळा: सरासरी भाव ₹१४२५/क्विंटल, कमीत कमी ₹३००/क्विंटल, जास्तीत जास्त ₹१५७५/क्विंटल. 

लासलगाव (विंचूर):  सरासरी भाव ₹१४५०/क्विंटल, कमीत कमी ₹६००/क्विंटल, जास्तीत जास्त ₹१६५२/क्विंटल. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group