दैनिक भ्रमर : स्वत:ची चूक असताना उर्मटपणे बोलणार्या परप्रांतीयाला मनसैनिकांनी चांगलाच धडा शिकवला.
नाशिक येथील जयभवानी रोड येथे एका मुजोर परप्रांतीयाने स्थानिक रहिवासी असलेल्या लासूरे या मराठी कुटुंबियावर दादागिरी करून शिवीगाळ व मारहाण केली. हा परप्रांतीय चार चाकी शिकताना लासुरे कुटुंबाच्या प्लेजर गाडीला धडकला. यात गाडीचे नुकसान झाले. लासुरे कुटुंबाने जाब विचारल्यानंतर त्याने कुटुंबाला शिवीगाळ करत ‘तुम मराठी लोग तुम्हारे औकात मे ं रहो, तुम्हारी गाडी और घर भंगार है’ असे म्हणून दादागिरी करू लागला.
त्यानंतर जयभवानीरोड येथील स्थानिक मनसेचे पदाधिकार्यांना याबाबत समजल्यावर त्यांनी परप्रांतीयाला समज दिली. परंतु या मुजोर परप्रांतीयाने उर्मटपणे उत्तर दिले की, मला मराठी येत नाही व मी हिंदीत बोलणार, तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला, असे तो म्हणाल्यावर एका मनसैनिकाने त्याच्या कानशिलात लगावली व लासुरे कुटुंबियाची माफी मागण्यास सांगितले.