सावधान: राज्यातील 'या' भागात पडणार आज मुसळधार पाऊस;
सावधान: राज्यातील 'या' भागात पडणार आज मुसळधार पाऊस; "या" जिल्हयांना अलर्ट
img
DB
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. कुठं मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागानं  दिलेल्या माहितीनुसार,आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावासाचा जोर कायम राहणार आहे. 

आज कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.रायगड आणि ठाणे जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

मान्सूनच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. पण पूर्व विदर्भाला अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.पश्चिम विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, उपराजधानीसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे कोरडेच राहीले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group