राज्यात पुन्हा  थंडी वाढणार ! ''या'' दोन जिल्ह्यांना  हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात पुन्हा थंडी वाढणार ! ''या'' दोन जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
img
दैनिक भ्रमर
यंदाच्या  हिवाळ्यात वातावरणात अनेक बदल झाले. अवकाळी पाऊस तर कधी दमट वातावरण तर अचानक कडाक्याची थंडी असे निरनिराळे बदल डिसेम्बर महिन्याचा सुरुवातीपासूनच अनुभवायला ,मिळाले दरम्यान. आता पुन्हा एकदा राज्यातील पार घसरणार असून पुन्हा एकदा कड्कयची थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

 नाशिकमध्ये 31 डिसेंबरला मुख्यतः निरभ्र आकाश असून तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.पुढील काही दिवसांत नाशिकमधील किमान तापमानात घट होऊन ते 10 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.   छत्रपती संभाजीनगर मधील किमान तापमानात घट होऊन ते पुन्हा 11 अंश सेल्सिअस पर्यंत येण्याची शक्यता आहे. तर नाशिकमधील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरात 31 डिसेंबरला मुख्यतः निरभ्र आकाश राहून तेथील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईतील किमान तापमानात पुढील काही दिवसांत घट होण्याची शक्यता आहे. मात्र, आता मुंबईमधील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस असल्याने येथील नागरिकांना उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
तसेच , पुण्यामध्ये 31 डिसेंबरला सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत पुण्यात सुद्धा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजी नगर मध्ये वर्षाच्या अखेरच्या दिवशी मुख्यतः निरभ्र आकाश असून तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत छत्रपती संभाजीनगर मधील किमान तापमानात घट होऊन ते 11 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये 31 डिसेंबरला नागपूरमध्ये अंशतः ढगाळ आकाश असून धुकं पडण्याची शक्यता आहे. नागपूर मधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. विदर्भात सुद्धा पुढील काही दिवसांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान,  नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानात घट होऊन या दोन शहरांत गुलाबी थंडी जाणवणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group