राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ झाली आहे. अकोला शहर मागील तीन दिवसांपासून राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरत आहे. जिथे कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचले.
त्या पाठोपाठ आता अमरावतीमध्ये ही तापमानाचा पारा चढला असून तो 43 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यातच आता पुण्याच्या तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात आज 42 अंश सेल्सिअस तापमान झालं आहे.
हवामान खात्याने पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडावे की नाही असा प्रश्न पडत आहे.
अकोला, अमरावती, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या शहरांमध्येही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.