ऐन नाताळात पाऊस बरसणार ! ''या'' जिल्ह्याला  हवामान विभागाचा अलर्ट
ऐन नाताळात पाऊस बरसणार ! ''या'' जिल्ह्याला हवामान विभागाचा अलर्ट
img
दैनिक भ्रमर
हिवाळा ऋतू सुरु असूनही सध्या राज्यात वातावरणात अनेक बदल होताना दिसत आहेत . या आधीही एन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर थन्डीने जोर धरला. दरम्यान आता ख्रिसमसला राज्यात अवकाळी पाऊस बारस्याची दाट  शक्यता आहे. 26 डिसेंबर पासून राज्यातील विविध भागांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पाहुयात पुढील 24 तासांत राज्यातील काही प्रमुख शहरात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.

मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये 25 डिसेंबरला अंशतः ढगाळ आकाश राहणार आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही शहरामध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 25 डिसेंबरला सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. नाशिकमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत 26 डिसेंबरपासून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये 25 डिसेंबरला धुक्यासह ढगाळ आकाश राहणार असून तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही शहरांमध्ये 26 डिसेंबरपासून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने 26 डिसेंबरसाठी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. राज्यातून जेमतेम थंडीचा जोर कमी झाला असताना आता पावसाचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे.

दरम्यान , 25 डिसेंबर रोज बुधवारला मुंबई आणि उपनगरांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार आहे. मुंबईमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईमधील किमान तापमानात आणखी वाढ झालेली दिसून येत आहे. पुण्यामध्ये 25 डिसेंबरला धुक्यासह ढगाळ आकाश राहून तेथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस ते किमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमानात वाढ झाल्याने तेथील तेथील थंडीचा जोर कमी झालाय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group