हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा; राज्याच्या
हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा; राज्याच्या "या" भागांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस
img
Jayshri Rajesh
राज्यासह देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज काही भागात रेड अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच आज देखील हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आजही राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह, कोकण, मराठवाड्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा. विदर्भातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा येथे जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पण सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही.

विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. वीज पडण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांनी झाडाखाली थांबू नये, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group