मान्सूनबाबत IMD चा ताजा अंदाज; महाराष्ट्रासाठीही दिली महत्त्वाची माहिती
मान्सूनबाबत IMD चा ताजा अंदाज; महाराष्ट्रासाठीही दिली महत्त्वाची माहिती
img
Nandini khandare More
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात उकाडा निर्माण झाला असून आता सर्वाना पावसाची प्रतीक्षा आहे. कधी एकदा मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो आणि कधी एकदा आपण पेरणीला सुरुवात करतो, याची शेतकरी वाट पाहात आहेत. दरम्यान, आता मान्सूनबाबत IMD ने नवीन अंदाज वर्तविला आहे. 

 अगोदर मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असे सांगितले जात होते. आता मात्र मान्सूनचे आगमन लांबले आहे. आता मान्सूनच्या आगमनाबाबत मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मान्सून कोणत्याही क्षणी केरळमध्ये धडकू शकतो. तो महाराष्ट्रातही कधी येणार, याबाबत नवा अंदाज समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांत कोणत्याही क्षणी मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. तसेच केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो पुढील आठ ते दहा दिवसांत महाराष्ट्रात येऊ शकतो. आता राज्यात पुढील पाच दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रत्नागिरी- कोकण किनारपट्टी भागात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी
याआधी राज्यात सगळीकडे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी- कोकण किनारपट्टी भागात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी लावली. सकाळपासून अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळाला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group