दुबईच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. आशर शेख यांचा सहभाग
दुबईच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. आशर शेख यांचा सहभाग
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी): 13 ते 15 जानेवारी या कालावधीत दुबईत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय 'आयुष' संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या आंतरराष्ट्रीय संमेलनात नाशिकचे होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. आशर शेख आमंत्रित करण्यात आले असून ते या संमेलनाच्या निमित्ताने एका महत्त्वपूर्ण आजारावर रिसर्च व केसेस सादर करणार 
आहेत. 

पॉलिसी स्टिक ओव्हेरियन या आजारावर  अभ्यासपूर्ण  संशोधन करून ते या संदर्भातील केस सादर करणार आहेत. डॉ. आशर शेख हे 'जी एन एम' जर्मन न्यू मेडिसिन या विषयावर ऑस्ट्रिया मधून शिक्षण घेऊन आले आहेत. 'जी एन एम' याद्वारे आजाराचे कारण शोधून होमिओपॅथीद्वारे आजाराचे मूळ शोधून काढतो त्यामुळे रिसर्च अधिक चांगले होते.

या आजारावर उपचार करणारे औषध आधुनिक वैधकशास्त्रात संशोधित होण्यास बरेच आव्हाने आहे. होमिओपॅथीच्या आधारे या आजारावर शंभर टक्के उपचार करता येतात, असा दावा डॉ. शेख  यांनी केला असून 13 ते 15 जानेवारी दरम्यान होणाऱ्या दुबई येथील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आणि प्रदर्शन येथे उपचारासंदर्भात दावा सांगत यावर मार्गदर्शन करणार आहेत.  'पीसीओडी' ह्या आजाराचे प्रमाण सध्या जगभर वाढत असून खाण्यापिण्याची पद्धत आणि ट्रेस यामुळे आजार मुलींमध्ये वाढत आहे.

पीसीओडीमध्ये त्याचा ओवेरीच अंडाशय यावर गाठी येतात. या आजाराला ॲलोपॅथिकमध्ये काहीही पर्याय नाहीत, त्यांच्याकडे इलाज नाहीत, या आजारावर केवळ हार्मोनल कीप्स देतात पण त्यामुळे इतरही आजार उद्भवू शकतात. हे औषध उपचार शॉर्ट पिरेडसाठी असतात ते लाँग टाईम घेतले तर त्यामुळे साईड इफेक्ट होऊ शकतात,  या वयात या मेडिसिन घेणे मुलींसाठी हानिकारकही असते, मात्र होमिओपॅथी हा एकमेव शंभर टक्के पर्याय आहे. 

होमिओपॅथीमुळे हा आजार पूर्णपणे मुळासकट बरा होऊ शकतो, आणि हा आजार होतो कशामुळे त्याचे कारण  जीएनएममध्ये दिलेले आहे. म्हणजे एखादी आवडती व्यक्ती आपल्यापासून दुरावली किंवा डेथ झाली, ब्रेक-अप झाला याद्वारे आपली आवडती व्यक्ती गमावण्याची भीती व्यक्त झाली की हा जर मुलींमध्ये होतो.

त्यामुळे या आजाराचे कारण शोधून त्याद्वारे मुलींना होमिओपॅथीचे मेडिसिन देऊन तो आजार मुळासकट नायनाट होऊन पूर्णपणे बरा होतो, हेच जीएनएममध्ये शिकायला मिळते. अशी बरी झालेली एक केस आणि त्याबरोबर अजून काही केसेस आहेत, त्याचा रिझल्ट या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये डॉ. शेख दाखवणार आहेत. आंतरराष्ट्रीय संमेलनात जगभरातील 25 हून अधिक देशांचा सहभागे सर्व तज्ज्ञ डॉक्टर वेगवेगळ्या आजारांवर रिसर्च व केसेस सादर करणार आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group