पंतप्रधान मोदींनी स्वत: घरी जाऊन प्रतिष्ठापणेचं निमंत्रण दिलेले निषाद कोण आहेत?
पंतप्रधान मोदींनी स्वत: घरी जाऊन प्रतिष्ठापणेचं निमंत्रण दिलेले निषाद कोण आहेत?
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : देशात सर्वत्र 'राममय' वातावरण तयार झालं आहे. अयोध्या नगरीत तर लोकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. येथे पंतप्रधान मोदींनी 8 किमी लांबीचा रोड शो केला. लोकांनी त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर मोदींनी अयोध्या स्थानकाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी 6 वंदे भारत आणि 2 अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. 

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मंगेशकर चौकात राहणाऱ्या निषाद परिवाराची भेट घेतली. यावेळी त्यांनी निषादांना राम लल्ला प्रतिष्ठापणानेसाठी निमंत्रण दिले.

पंतप्रधान मोदी यांनी स्वत: रविंद्र मांझी आणि त्यांच्या कुटुंबियांना राम लल्लाच्या प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. तसेच २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या उद्धाटनासाठी येण्याचा आग्रह केला. यावेळी राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय हे देखील उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी रविंद्र मांझी यांच्या मुलांची देखील भेट घेतली. त्यांनी मीरा मांझी या लहान मुलीसोबत सेल्फी देखील काढला. सहावीत शिकणाऱ्या अनुज याने राम मंदिराच्या काढलेल्या पेंटिंगवर मोदींनी ऑटोग्राफ देखील केला. 

निषाद कोण आहेत?
प्रभु राम जेव्हा सीता माता आणि लक्ष्मण सोबत वनवासाला जात होते. त्यानेळी निषाद राज यांनी त्यांना आपल्या जहाजातून शरयू नदी पार केले होते. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत ज्या निषाद परिवाराची भेट घेतली, ते निषाद राज यांचे वंशज असल्याचं सांगितलं जातं. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील निषाद कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांच्या घरी जेवण देखील केलं होतं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group