येत्या २२ तारखेला अयोध्या येथे भगवान श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरातून लाखो रामभक्त अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. तसेच या सोहळयाला देशातील 7000 दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान या सोहळ्याला उपस्थित राहता येत नसलं, तरी थिएटरमध्ये याचं थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. याबाबत नुकतीच PVR आयनॉक्स लिमिटेडने घोषणा केली आहे.
22 जानेवारी 2024 रोजी आपल्या थिएटरमध्ये राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे Live स्क्रिनिंग करणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याला उपस्थित न राहता राहता देखील तुम्ही श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठान सोहळा पाहू शकता. पीव्हीआर-आयनॉक्स या देशातील अग्रगण्य थिएटर चेनने हा निर्णय घेतला आहे. देशभरातील 70 शहरांमधील 160 चित्रपटगृहांमध्ये या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
त्यामुळे ज्या रामभक्तांना अयोध्येत जाणून श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा बघणं शक्य होणार नाही ते भक्त थेटर मध्ये जाऊन हा भव्य दिव्य सोहळा पाहू शकतात. PVR ने यासाठी आज तक सोबत करार केला आहे. देशातील एकूण 70 शहरांमधील 160 चित्रपटगृहात ही सुविधा देण्यात येणार आहे. या संपूर्ण सोहळ्याचे Live स्क्रिनिंग सकाळी 11 वाजल्यापासून ते राम मंदिराचा अभिषेक सोहळा संपेपर्यंत म्हणजेच 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
तिकीट दर किती?
ऑनलाइन तिकीट बुकिंग अॅप बुक माय शोने या विशेष कार्यक्रमासाठी तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग सुरू केले आहे. सध्या तरी दिल्ली-एनसीआर आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधील चित्रपटगृहांमध्ये प्री बुकिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी 100 रुपये तिकीट दर आकारण्यात येणार आहे, या किंमतीत दर्शकांना पॉपकॉर्न आणि बेव्हरेज कॉम्बो देखील मिळणार आहे.