देशातच नाही तर परदेशातही राम मंदिराचा उत्साह; 'या' देशाने जाहीर केली २२ जानेवारीला सुट्टी
देशातच नाही तर परदेशातही राम मंदिराचा उत्साह; 'या' देशाने जाहीर केली २२ जानेवारीला सुट्टी
img
Dipali Ghadwaje
22 जानेवारीला अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचे उद्घाटन  होत आहे. मंदिराच्या उद्घाटनासाठी देश तर सज्ज झालाच आहे, मात्र परदेशातून देखील उत्साह दिसून येत आहे. राम मंदिर प्रतिष्ठापणा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांनी सुट्टी घोषित केली आहे. तर आता मॉरिशस सरकार या कार्यक्रमासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

22 जानेवारी रोजी हिंदू अधिकाऱ्यांसाठी मॉरिशस सरकारने दोन तासांची विशेष सुट्टी जाहीर केली आहे. जेणेकरून हिंदू अधिकाऱ्यांना हा सोहळा पाहता येईल. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्या नेतृत्वाखाली मॉरिशस मंत्रिमंडळाने ही घोषणा केली आहे.

हिंदूंसाठी ही एक ऐतिहासिक घटना आहे, कारण ती प्रभू रामाच्या पुनरागमनाचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत मॉरिशस सरकारचे हिंदू अधिकारी आणि कर्मचारी त्या दिवशी 2 तासांच्या विशेष रजेवर असतील. भावना आणि परंपरांचा आदर करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी सांगितले. 

मॉरिशसमध्ये 48.5 टक्के हिंदू
मॉरिशसमध्ये हिंदू धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे. येथील सुमारे 48.5 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. आफ्रिकेतील हा एकमेव देश आहे जिथे इतक्या मोठ्या संख्येनं हिंदू राहतात. जागतिक पातळीवर पाहिले तर हिंदू लोकसंख्येच्या बाबतीत भारत आणि नेपाळनंतर मॉरिशसचा क्रमांक लागतो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group