महत्वाची बातमी :
महत्वाची बातमी : "त्या" निर्णयाबाबत मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण ; केंद्र सरकारच्या उत्तराने मिटला संभ्रम
img
Dipali Ghadwaje
केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की येत्या 1 मेपासून देशात उपग्रह आधारीत टोल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. 

मीडियात येत असलेल्या बातम्यांवर मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. यात दावा करण्यात आला होता की 1 मेपासून उपग्रह आधारित टोल प्रणाली देशभरात सुरू केली जाणार आहेत. परंतु, आता मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिल्याने याबाबतीत संभ्रम मिटला आहे.

मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की टोल प्लाझाच्या  माध्यमातून वाहतुकीतील अडथळे कमी करण्यासाठी तसेच प्रवासा दरम्यान वेळ कमी करण्यासाठी काही ठराविक टोलनाक्यांवर स्वयंचलित नंबर प्लेट ओळख (एएनपीआर) फास्टॅग टोलिंग व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे.

अॅडव्हान्स टोल प्रणालीत एएनपीआर प्रौद्योगिकी वाहनांच्या नंबर प्लेट वाचून त्यांची ओळख पटवील. तसेच सध्याच्या फास्टॅग प्रणालीत टोल कपातीसाठी दी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनचा (आयएफआयडी) वापर केला जातो त्याचे संयोजन करण्यात येईल.

टोलनाक्यावर थांबू नका, तरीही टोल होईल कट

याअंतर्गत वाहनांना टोलनाक्यांवर टोलसाठी थांबण्याची काहीच गरज राहणार नाही. उच्च तंत्रज्ञानाचे कॅमेरे आणि फास्टॅग रिडर वाहनांची ओळख केली जाईल. यानुसार वाहनचालकांचे शुल्क निश्चित केले जाईल. जर वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांना ई नोटीस जारी केली जाईल.

या नोटीसीतील दंडाची रक्कम जमा केली नाही तर वाहनांचे फास्टॅग निलंबित केले जातील तसेच वाहनाशी संबंधित अन्य प्रकारचे दंड आकारले जातील असा इशारा देण्यात आला आहे.

देशातील निवडक टोल नाक्यांवर हायब्रीड ANPR-FASTag आधारित बॅरियर लेस टोलिंग सिस्टीमचा समावेश असलेला एक प्रोजेक्ट सुरू करण्यात येईल.

प्रगत टोलिंग सिस्टीम ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन तंत्रज्ञान एकत्र करेल. जे वाहनांच्या नंबर प्लेट वाचून ओळखेल आणि टोल कपातीसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन वापरणारी सध्याची FASTag सिस्टीम असे निवेदनात म्हटले आहे.

 
 
  
  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group