अधिकाधिक मुलांना जन्म देण्यामागे; इलॉन मस्क यांनी सांगितलं
अधिकाधिक मुलांना जन्म देण्यामागे; इलॉन मस्क यांनी सांगितलं "हे" कारण
img
Jayshri Rajesh
प्रख्यात उद्योगपती इलॉन मस्क हे नुकतेच बाराव्या अपत्याचे पिता बनले आहेत. मस्क यांच्या असलेल्या १२ मुलांमुळे ते सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. मुलांना जन्म देण्याबाबत इलॉन मस्क यांनी नेहमीच सकारात्मकतेने विचार केला आहे.

 अधिकाधिक मुलांना जन्म देण्याची त्यांची इच्छा असल्याचेही मस्क यांनी म्हटले आहे. इलॉन मस्क यांनी त्यांच्या बाराव्या अपत्याचे स्वागत करताना सांगितलं की, न्यूरालिंकच्या कर्मचारी शिवोन जिलीस हिच्याकडून जन्माला आलेलं नवं बाळ हे काही सिक्रेट नव्हतं.

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क आणि जिलीस यांचं हे तिसरं अपत्य आहे. तत्पूर्वी जिलीस हिने जुळ्या बाळांना जन्म दिला होता. जिलीस न्यूरालिंकमध्ये ऑपरेशन्स आमि स्पेशल प्रोजेक्टची संचालक आहे. इलॉन मस्क यांना पहिली पत्नी जस्टिन हिच्यापासून झालेली पाच मुलं आहेत. तर कॅनेडियन संगितकार ग्राइम्स हिच्यापासून त्यांना तीन मुलं झाली आहेत. दरम्यान, अधिकाधिक मुलांना जन्म देण्याबाबत इलॉन मस्क यांनी खास असं कारण दिलेलं आहे.

भारतासारख्या देशात हम दो हमारे दो असे धोरण राबवण्याची वेळ आली असताना एलॉन मस्क यांच्या मुलांची संख्या बारावर पोहोचली आहे. याआधी जुलै 2022 मध्ये कुटुंब मोठं असावं, तसेच जास्तीत जास्त मुलं व्हावीत, अशी इच्छा व्यक्त केली होती. सध्या जन्मदर वेगाने घटत असल्याच्या समस्येवर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भाष्य केलं होतं. आता त्यांच्या बाराव्या मुलाची खूप चर्चा सुरु आहे. भविष्यात ते किती मुलांचे बाबा होणार आहेत, असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.

 ज्या लोकांसा आयक्यू चांगला आहे. म्हणजेच जे लोक अधिक बुद्धिमान आहेत. त्यांनी अधिकाधिक मुलांना जन्म दिला पाहिजे. अनेक लोक मुलांना जन्म न देण्याचा निर्णय घेत आहेत. अनेक चांगले आणि स्मार्ट लोक जगातील लोकसंख्या ही प्रमाणाबाहेर वाढल्याचा विचार करत आहेत, असेही मस्क यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group