ना Toll प्लाझा, ना Fastag, आता येतेय नवी प्रणाली; काय म्हणाले नितिन गडकरी....वाचा
ना Toll प्लाझा, ना Fastag, आता येतेय नवी प्रणाली; काय म्हणाले नितिन गडकरी....वाचा
img
DB
भाजप नेते तथा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी टोलसंदर्भात एक मोठी माहिती शेअर केली आहे. सरकार लवकरच टोल यंत्रणा रद्द करण्याचा विचार करत आहे. त्या जागी आता नवीन प्रणाली येणार आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे. त्यांनी X प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात माहिती दिली आहे. 



टोल वसुलीची ही नवीन प्रणाली अथवा यंत्रणा उपग्रह आधारित असणार आहे. ही यंत्रणा लवकरच सुरू केली जाईल. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची डेडलाइन समोर आलेली नाही. या यत्रणेंतर्गत, युजर्स महामार्गावर जेवढे किलोमिटर अंतर पार करतील, त्यानुसार त्यांच्या बँक खात्यातून आपोआप पैसे कापले जातील. यामुळे युजर्सना सेव्हिंगचीही संधी मिळेल. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group