अहमदनगर : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलीची सक्रिय राजकारणात एन्ट्री झाली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. जयश्री थोरात यांच्यावरील नवी जबाबदारी दिल्याने चर्चांना उधाण झालं आहे. जयश्री थोरात यांची संगमनेर विधानसभा युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नगरच्या राजकारणात ट्विस्ट येणार का अशीही चर्चा रंगली आहे.
सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या जयश्री थोरात यांनी आता थेट सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. जयश्री थोरात यांच्यावर पहिल्यांदाच पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे. थोरातांचे भाचे सत्यजित तांबे आधी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. सत्यजित तांबे यांच्या निलंबनानंतर बाळासाहेब थोरात यांच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झाला आहे.
त्यामुळे भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात यांच्यानतंर आता डॉ. जयश्री थोरात सक्रीय राजकारणात आल्या आहेत. त्यामुळे थोरातांची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात आली आहे.
कोण आहेत जयश्री थोरात?
डॉ. जयश्री थोरात या बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत. डॉ. जयश्री थोरात कॅन्सरतज्ज्ञ आहेत. त्या एकवीरा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.