मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून नजीक समुद्रात बुधवारी (18 डिसेंबर) एक भीषण अपघात झाला. ज्यामध्ये नौदलाच्या एका स्पीड बोटीने नीलकमल नावाच्या एक प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली. ज्यामुळे प्रवासी बोट समुद्रात बुडाली.
या अपघातात तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी बेपत्ता आहेत. आता प्रशासनाकडून 13 मृतांची ओळख पटवून त्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत एकूण 115 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे.
नीलकमल बोट दुर्घटनेतील मृतांची नावं :
- निधिश राकेश अहिरे - वय, 8 वर्ष (राहणार, नाशिक)
- राकेश नानाजी अहिरे - वय, 34 वर्ष (राहणार, नाशिक)
- हर्षदा राकेश अहिरे - वय, 31 वर्ष (राहणार, नाशिक)
- माही साईराम पावरा - वय, 3 वर्ष (राहणार, धुळे)
- शफीना अशरफ पठाण - वय, 34 वर्ष (राहणार, गोवा)
- प्रविण रामनाथ शर्मा - वय, 34 वर्ष (राहणार, आंध्रप्रदेश)
- मंगेश महादेव केळशीकर- वय, 33 वर्ष (राहणार, बदलापूर)
- मोहम्मद रेहमान कुरेशी - वय, 35 वर्ष (राहणार, बिहार)
- रमा रतीदेवी गुप्ता - वय, 50 वर्ष (राहणार, नालासोपार)
- महेंद्रसिंह विजयसिंह शेखावत - वय, 31 वर्ष (राहणार, नेव्हीनगर नेव्हल स्टेशन करंजा)
- प्रज्ञा विनोद कांबळे- वय, 39 वर्ष (राहणार, नवी मु्ंबई)
- टी दीपक (नौदल) - वय, 40 ते 45 वर्ष (राहणार, नौदल)
- दीपक निळकंठ वाकचौरै - वय, 50 वर्ष (राहणार, गोवंडी)