दुर्दैवी घटना..! भाऊ बहिणीचा तापी नदीत बुडून मृत्यू
दुर्दैवी घटना..! भाऊ बहिणीचा तापी नदीत बुडून मृत्यू
img
Dipali Ghadwaje
धुळे  शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावात घटस्थापनापूर्वीच शोककळा पसरली आहे.  सोनेवाडी गावात नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू झाल्याची  दुर्दैवी घटना घडली आहे

सर्वपित्री अमावस्यानिमित्त गावा जवळच असलेल्या तापी नदी पात्रात दोघे भाऊ बहिणी हे बेल पत्र टाकण्यासाठी गेले होते.  या नदीपात्राजवळ उत्कर्ष रमेश पाटील (वय 13) राहणार सोनेवाडी याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला.

त्यावेळी, त्याला वाचवण्यासाठी त्याचीच बहीण वैष्णवी सुरेश पाटील हिने नदीपात्राकडे धाव घेतली. मात्र, भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याचा अंदाज न आल्याने ती देखील पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली असून पोलिसांनाही कळविण्यात आले आहे. 

नदीपात्रात दोघे चिमुकले बुडत असल्याचे पाहून सदर ठिकाणी वैष्णवीच्या काकांनी देखील दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाणी जास्त असल्याने त्या दोघांना वाचण्यात त्यांना अपयश आले. नदी पात्रातून बाहेर काढल्यानंतर दोघांनाही शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. 

मात्र, डॉक्टरांनी तपासून त्या दोघा बहिण भावांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group