लाल मिरची, मसाल्यात केमिकल रंग भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
लाल मिरची, मसाल्यात केमिकल रंग भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
img
DB
धुळे :  भारतीय मसाले आपली चव आणि दर्जासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. हे मसाले उत्तम चवीसोबत आरोग्याला फायदे देणारे असतात. अशात या संदर्भात  धुळ्यातून एक मोठी  खळबळजनक बातमी समोर आली आहे.  रोजच्या स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग मिक्स करून बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.  पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी हि कारवाई केली आहे. यात मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांमध्ये अत्यंत हानिकारक आणि टॉक्सिक रंग व केमिकल्स वापरले जातात; अशी माहिती धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला प्राप्त झाली होती. 

यानंतर पथकाने एमआयडीसी मधील मसाले निर्मितीच्या कंपनीत छापेमारी केली आहे. यात पथकाने केलेल्या तपासात हा भेसळीचा प्रकार करण्यात मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे.

नमुने तपासणीसाठी धुळे एमआयडीसी मोहाडी येथे लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग आणि केमिकल्सच्या भेसळीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. यासंदर्भात दोघा संशयितांची चौकशी फूड अँड ड्रग्स विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व तपास करण्यात येत असून यासंदर्भात फूड अँड ड्रग्स विभागाचा पथकाने येथील नमुने देखील तपासणीसाठी घेतले आहेत. फूड अँड ड्रग्स विभागाच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group