मोठी बातमी : ऑस्ट्रेलियात मॉलमध्ये भीषण दहशतवादी हल्ला, नागरिकांमध्ये भीतीच वातावरण ;  नेमकं काय घडलंय?
मोठी बातमी : ऑस्ट्रेलियात मॉलमध्ये भीषण दहशतवादी हल्ला, नागरिकांमध्ये भीतीच वातावरण ; नेमकं काय घडलंय?
img
DB
सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियात सिडनी येथे एका मॉलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, सिडनी येथील एका शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार झाला असून चाकूने सुद्धा हल्ला करण्यात आला. यात काही जणांचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या शॉपिंग सेंटरमध्ये घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सिडनी पोलिसांच्या मते हा दहशतवादी हल्ला आहे. हल्ल्यानंतर मॉलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. लोक आपले प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हजारो लोकांना मॉलमधून बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार न्यू साऊथ वेल्स राज्याच्या पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेराव टाकलाय. सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात जमाव मॉल बाहेर पळताना दिसतोय. पोलिसांच्या गाड्या आणि इमर्जन्सी सेवा त्या क्षेत्रामध्ये दिसतायत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर होते. त्यात एकाला मारण्यात आलय. दुसऱ्याचा शोध सुरु आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group