ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या मध्यावरच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. खरं तर, त्याचा फॉर्ममध्ये असलेला अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श मायदेशी परतला आहे. सध्या सुरू असलेल्या ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मधून अनिश्चित काळासाठी बाहेर पडला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मार्श गुरुवारी भारतातून मायदेशी परतला आणि उर्वरित सामन्यांमध्ये त्याच्या सहभागाबाबत निश्चितता नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना इंग्लंड संघासोबत होणार आहे. अव्वल चारमध्ये कायम राहण्यासाठी ऑस्ट्रेलियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यातच मिच मार्श या महत्वाच्या सामन्यापूर्वी मिचेल मार्शचे अचानक मायदेशी परतल्याने ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मिचेल मार्श विश्वचषक २०२३ स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याने ६ सामन्यात ३७.५० च्या सरासरीने आणि ९१.४६ च्या स्ट्राईक रेटने २२५ धावा केल्या आहेत. याशिवाय मार्शने २ विकेट्स देखील घेतला आहे.