ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला, बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर मृतदेहांचा खच
ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला, बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर मृतदेहांचा खच
img
वैष्णवी सांगळे
ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या बाँडी बीचवर हनुखा सणानिमित्त आयोजित ‘चानुका बाय द सी’ कार्यक्रमादरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान १६ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ४० जण जखमी झाले. पोलिसांनी या घटनेला दहशतवादी हल्ला घोषित केले आहे. मृतांमध्ये १० वर्षांच्या मुलीसह विविध वयोगटातील नागरिकांचा समावेश असून बहुतांश बळी ज्यू समुदायातील असल्याची माहिती आहे.

बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर ज्यू नागरिक सण साजरा करत असताना दोन हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि पळापळ सुरु झाली. मात्र काही वेळानं पोलिसांनी एका हल्लेखोराला गोळ्या घातल्या. तर दुसरा हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्यू समुदायाला लक्ष्य करण्यात आल्यानं स्थानिक ज्यू बोर्डानं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. ज्यू समुदायाचे नेतेही पोलिसांशी संपर्क साधून आहेत. 

हा हल्ला रविवारी सायंकाळी घडला. घटनास्थळी १४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी दोघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.

हा हल्ला 1996 मधील पोर्ट आर्थर हत्याकांडानंतर ऑस्ट्रेलियातील सर्वांत प्राणघातक सामूहिक गोळीबार ठरला आहे. त्या घटनेनंतर देशात शस्त्रकायद्यांमध्ये कठोर बदल करण्यात आले होते. सध्याच्या प्रकरणात जप्त शस्त्रांचा वापर हल्ल्यात झाला का, याबाबत फॉरेन्सिक आणि बॅलिस्टिक चाचण्या सुरू आहेत. पोलिसांनी तिसऱ्या संशयिताचा शोध नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group