एकदिवसीय विश्वचषक 2023 पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि मुख्य सिलेक्टर्स अजित आगरकर यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे संघाची घोषणा केली.
रविचंद्रन अश्विनचे संघात पुनरागमन झाले आहे. अश्विनच्या समावेशामुळे संघ आणखी मजबूत झाला आहे. अक्षर पटेलच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे. आशिया कप दरम्यान अक्षर जखमी झाला होता. आशिया चषकासाठी निवडलेले जवळपास सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळणार आहेत.
असा असेल भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.