पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मोठा खुलासा ,
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मोठा खुलासा , "ही" माहिती आली समोर
img
Dipali Ghadwaje
मंगळवारी दुपारी पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म कोणता असं विचारून गोळ्या घातल्या. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामात झालेल्या हल्ल्यानंतरचा हा दुसरा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. 

या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. सहा दहशतवाद्यांनी हत्याकांड घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. टीआरएफ कमांडर सैफुल्लाहने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आता या हल्ल्याबाबत मोठी माहिती हाती आली आहे. हल्ला करण्याआधी अतिरेक्यांनी या परिसराची रेकी केली होती.

जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल  दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून  त्यांना गोळ्या घातल्या.

भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

  

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group