नवी दिल्ली : मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या अतिरिक्त सुरक्षा ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जिरीबामचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त सुरक्षा पथक पाहणीसाठी जिरीबामला निघालं असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी अॅडवान्स सुरक्षा पथकावर सुरक्षा पथकावर कुकी हल्लेखारांनी हल्ला केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंगळवारच्या दौऱ्यावर निघण्याआधीच त्यांच्या सुरक्षा पथकावर हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एन बीरेन सिंह जिरीबाम या भागाच्या दौऱ्यावर जाणार होते.
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या अॅडवान्स सुरक्षा दलावर झालेल्या हल्ल्यात सीआयडी राज्य पोलीस, सीआईएसएफ जवानासहित २ सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यातील जखमींना इंफाळ येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी जिरीबाममध्ये हिंसा झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या भागात परिस्थिती तणावपूर्ण आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्याची मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांना मंगळवारी जिरीबाम येथे जायचं होतं.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्र्यांचे अग्रिम सुरक्षा दल इंफाळहून जिरीबामला चाललं होतं. त्याचवेळी सकाळी १०.३० वाजता कांगपोकपी जिल्ह्यातील कोटलेनजवळ टी लाइजांग गावाजवळ हल्ला झाला. या हल्ल्यात दोन सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले. या हल्ल्यानंतर पोलीस कमांडो आणि आसाम रायफल्सने सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री सिंह ६ जूनला अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यक्तीचं धड छाटल्यानंतर वातावरण तापलं होतं. त्यानंतर हल्लेखोरांनी परिसरातील घरे पेटवली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिंह जीरीबाम दौऱ्यावर जाणार होते. या घटनेनंतर ७० घरे आणि काही सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली होती. यामुळे शेकडो लोकांची पळापळ झाली होती.