चक्क मुख्यमंत्र्यांनाच फसवलं; ताफ्यातील १९ गाड्यांमध्ये डिझेलऐवजी भरलं पाणी  ; कुठे घडला 'हा' धक्कादायक प्रकार
चक्क मुख्यमंत्र्यांनाच फसवलं; ताफ्यातील १९ गाड्यांमध्ये डिझेलऐवजी भरलं पाणी ; कुठे घडला 'हा' धक्कादायक प्रकार
img
Dipali Ghadwaje
पेट्रोल पंपावरील पेट्रोल किंवा डिझेलमध्ये पाण्याचाही अंश असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं आपण पाहिले असेल. मिश्रित पेट्रोल-डिझेल विकलं जात असल्याची तक्रार अनेकवेळा नागरिक करत असतात, पण विचार करा जेव्हा स्वत: मुख्यमंत्र्यांनाच पेट्रोल पंपवाल्यानं फसवलं तर. त्यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये डिझेलऐवजी पाणी भरलं तर, हे वाचून तुम्हा सगळ्याच्या भुवया उंचावल्या असतील ना, पण हो हे खरंच घडलंय.

पाणी मिश्रित डिझेल भरल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफ्यातील तब्बल १९ गाड्या अचानक बंद झाल्या. गाड्या अचानक बंद झाल्यानंतर मोठी खळबळ उडली होती. वाहनांची तपासणी केल्यानंतर धक्कादायक हा प्रकार समोर आलाय.

मध्य प्रदेशातील रतलाम येथे झालेल्या औद्योगिक परिषदेदरम्यान एक मोठा निष्काळजीपणा समोर आलाय.

मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील डझनभराहून अधिक वाहने अचानक वाटेत बंद पडली. सुरुवातीला ही तांत्रिक बिघाड वाटत होता, पण जेव्हा वाहनांची तपासणी केली तेव्हा त्या गाड्यांमध्ये पाणी मिश्रित डिझेल भरल्याचं आढळून आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, दोसीगाव येथील पेट्रोल पंपावरून या सर्व वाहनांमध्ये डिझेल भरण्यात आले होते. या घटनेनंतर प्रशासनात खळबळ उडाली.
तात्काळ कारवाई करत संबंधित पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे. त्यानंतर इंधनाचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

ज्या वाहनांमध्ये २० लिटर डिझेल भरले होते, त्या वाहनांमधून सुमारे १० लिटर पाणी बाहेर पडल्याचे तपासात समोर आले. जवळजवळ सर्वच वाहनांमध्ये ही स्थिती आढळून आली.

एका ट्रक चालकाने २०० लिटर डिझेलही भरले होते, जे थोड्या अंतरावर गेल्यानंतर बंद पडले होते. प्रशासनाच्या सुरुवातीच्या तपासात पावसामुळे डिझेल टाकीमध्ये पाणी गळती झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय.

दरम्यान पेट्रोल पंपांवर इंधनाची गुणवत्ता तपासण्यासाठी काय व्यवस्था आहे आणि असे भेसळयुक्त इंधन सामान्य लोकांनाही दिले जात आहे का, असे प्रश्नही उपस्थित केले जाताहेत.

दरम्यान जिल्हाधिकारी या प्रकरणाची तपासणी करत आहेत. इंधनाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत, याचा अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई केली  जाणार आहे.

CM | petrol | Diesel |
इतर बातम्या
Join Whatsapp Group