मुंबई : लोकसभा निवडणुकीआधीच आनंदाची बातमी आहे. आज केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघा काही काळ शिल्लक असताना मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त करत असल्याची घोषणा केली आहे. संपूर्ण देशभरात हे दर स्वस्त होणार आहेत. हे दर उद्यापासून लागू देखील होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्याआधी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलचे हे नवीन दर उद्या सकाळी 6 वाजेपासून देशभरात लागू होणार आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विटरवर (X) या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी घट करुन एकदा पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, मोदींचं कोट्यवधी भारतीयांच्या परिवाराचं हित आणि सुविधांवर लक्ष्य आहे”, असं केंद्रीय मंत्री हरदीप पुरी म्हणाले आहेत.