विधानसभा निवडणुकीच्या आधी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जातेय. लिटरमागे किमान 2 रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती कमी जास्त होत आहेत. दरम्यान भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नाहीत. नेमके दर का कमी होत नाहीत? या प्रश्नाने सर्वसामान्य जनता चिंतेत असतानाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार नाही, असं म्हणता येणार नाही, अशी माहिती आता समोर आली आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात प्रति पिंप 70 डॉलरच्या खाली घसरले आहे. डिसेंबर 2021 नंतर प्रथमच तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र, एक दोन दिवसानंतर पुन्हा तेलाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आली आहे. सध्या दरात चढ उतार सुरुच आहे. त्यामुळं देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, आता नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीपुर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची आशा व्यक्त केली जातेय.
राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याचा अंदाज आहे. पण पेट्रोल आणि डिझेलमध्ये किती कपात होणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. तर या दोन्हीमध्ये प्रत्येकी 2 रुपयांची घसरण होणार असल्याचंही बोललं जात आहे.
भारत हा जगातील सर्वांत मोठा तिसरा तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 87 टक्के विदेशी स्त्रोतांवर अवलंबून आहे. अशा स्थितीत भारत आता भारत कच्च्या तेलाची जास्तीत जास्त खरेदी करण्यास तयार आहे.