सर्वसामान्यांना दिलासा मिळणार?  फेब्रुवारीत पेट्रोल
सर्वसामान्यांना दिलासा मिळणार? फेब्रुवारीत पेट्रोल "इतक्या" रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता?
img
Dipali Ghadwaje

2024 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. त्यामुळं मतदारांना आकर्षित करण्यासाठी, महागाई नियंत्रीत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. महागाई रोखण्यासाठी सरकारनं विविध उपाययोजना राबवल्या आहेत. अनेक पिकांसंदर्भात निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. आता अशातच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देखील कमी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.


फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दर 10 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहेमिळालेल्या माहितीनुसार,तिसऱ्या तिमाहीत तेल कंपन्यांचा नफा 75 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.


त्यामुळं सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी तेल कंपन्यांवर दबाव आणू शकते. यामुळं सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळेल आणि 2024 च्या निवडणुकीपूर्वी महागाई नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होईल असे दिसत आहे.

निवडणुकीपूर्वी महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशातील सरकारी तेल कंपन्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करु शकतात. दोन्हीच्या किमती 10 रुपयांनी कमी करण्याचा विचार केला जात आहे. तेल कंपन्यांचा नफा तिसऱ्या तिमाहीत 75 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी तेल कंपन्यांवर दबाव आणू शकते.  सरकारी OMC ने एप्रिल 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर मे महिन्यात केंद्र सरकारने करात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली होती. 

इंधन विक्रीवरील उच्च विपणन मार्जिनमुळं, तीन ओएमसींनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत मोठा नफा कमावला आहे. जो तिसऱ्या तिमाहीत सुरू राहू शकतो. या महिन्याच्या अखेरीस या तिन्ही कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील. त्यानंतर कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती लक्षात घेऊन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 5 ते 10 रुपयांनी कमी करु शकतात. कंपन्यांच्या लाभार्थ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाणार आहे. 

कच्च्या तेलाच्या कमी किमती आणि उच्च सकल शुद्धीकरण मार्जिन यामुळे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जुलै-सप्टेंबर या तिमाहीत रु. 5,826.96 कोटी नफा कमावला होता. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन  ने सप्टेंबर तिमाहीत 8,244 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. दुसरीकडे, IOCL चा निव्वळ नफा 12,967 कोटी रुपये होता. याचा अर्थ तिन्ही कंपन्यांचा निव्वळ नफा 27,038 कोटी रुपये होता

जर आपण पहिल्या तिमाहीबद्दल बोललो तर तिन्ही ओएमसींनी दुसऱ्या तिमाहीपेक्षा जास्त नफा कमावला होता. IOCL ला पहिल्या तिमाहीत 13,750 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर दुसऱ्या जून तिमाहीत बीपीसीएलला 10,550.88 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर HPCL ने जून तिमाहीत 6,203.90 कोटी रुपयांचा नफा

इतर बातम्या
Join Whatsapp Group