केंद्रात जाणार की राज्यातच थांबणार? शिंदेंनी स्पष्टच सांगितले ...
केंद्रात जाणार की राज्यातच थांबणार? शिंदेंनी स्पष्टच सांगितले ...
img
Dipali Ghadwaje
महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण? भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाबाबात दावा करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. एकनाथ शिंदेंना केंद्रात जाण्याची ऑफर दिल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. या सर्व घडामोडीवर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलेय. केंद्रात जाणार की राज्यातच राहणार, या प्रश्नाचं उत्तर देताना शिंदे म्हणाले की, "दिल्लीला उद्या आमची बैठक आहे. अमित शहांसमोर तिन्ही पक्षांची बैठक आहे. त्याच्यासमोर चर्चा होईल. त्यात निर्णय होईल."

महाराष्ट्राचं जनतेचं प्रेम मिळालं. ते आतापर्यंत कुणाला मिळालं नाही. सख्खा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली. हे कमी नाही. मी ज्या काही योजना आणल्या. त्या मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले, ते त्यांना माहीत आहेत. त्यांचा हा मोठेपणा आहे, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

राज्यात की केंद्रात? काय म्हणाले एकनाथ शिंदे आता आम्हाला चांगलं महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे. महायुती मजबुतीने काम करणार आहे. उद्या आमची दिल्लीला अमित शहांसमोर बैठक होणार आहे. तिन्ही पक्षांची बैठक असेल, त्यांच्यासमोर चर्चा होईल. त्यात निर्णय होईल. मी काल मोदी, शाह यांच्याशी फोनवर बोललो.

 सरकार स्थापन करण्यात कुठलाही अडथळा नाही. जो वरिष्ठ निर्णय घेतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. उद्या अमित शहांसोबत बैठक आहे. त्यात जी चर्चा होईल, निर्णय होईल. काल मोदींना मी सांगितलं आहे की, जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आहे. मोदींना आणि अमित शहांनाही हेच सांगितलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group