मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. डोळ्याचा त्रास होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळ्याची तपासणी केली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर लेझर ट्रिटमेंटद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या ठाण्याच्या घरी परतले आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या शस्त्रक्रियेनंतर काही काळ विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.