उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देवेंद्र फडणवीसांच्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी, नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देवेंद्र फडणवीसांच्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी, नेमकं काय घडलं?
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुतीचं सरकार  स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. दरम्यान,  नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदे हे नाराज होते, त्यामुळे ते आपल्या मुळगावी दरेगावला गेल्याची चर्चा रंगली, त्यानंतर पालकमंत्रिपदावरून देखील एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती समोर आली होती, 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित नव्हते. त्यानंतर आता त्यांनी फडणवीसांनी बोलावलेल्या आणखी एका महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे या बैठकीला हजर नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या बैठकीला हजेरी लावली.यामुळे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चाना उधाण आले असल्याची माहिती आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group