सस्पेन्स वाढला! महायुतीतील तिन्ही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदेंचे नाव गायब
सस्पेन्स वाढला! महायुतीतील तिन्ही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदेंचे नाव गायब
img
Dipali Ghadwaje
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी साडेपाच वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका देखील समोर आल्या आहेत.

शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या निमंत्रण पत्रिकेवरती एकनाथ शिंदे यांचा नाव नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या निमंत्रण पत्रिकेवरती एकनाथ शिंदे यांचा नाव दिसत नसल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या निमंत्रण पत्रिकेवरती केवळ देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या निमंत्रण पत्रिकेवरती देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं नाव आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे या सरकारमध्ये कोणत्या पदावर दिसणार याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका काढण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब झाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही याबाबत सस्पेंस निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची शपथविधी समारंभाची गुलाबी पत्रिका व्हायरल झाली आहे. शपथविधी पत्रिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नावाचा उल्लेख पाहायला मिळत आहे. या शपथविधी पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचे नाव दिसत नाहीये. ही शपथविधीची पत्रिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचे नाव दिसत नसल्यामुळे ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group