फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट ! PSI गोपाळ बदने याच्यावर मोठी कारवाई
फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट ! PSI गोपाळ बदने याच्यावर मोठी कारवाई
img
वैष्णवी सांगळे
संपूर्ण राज्यात साताऱ्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण हा चर्चेचा विषय आहे. महिला डॉक्टरची हत्या की आत्महत्या यावर अजूनही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संपदा मुंडे या डॉक्टर तरुणीने तळ हातावर सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली होती. यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. 



गोपाळ बदनेवर मोठी कारवाई
महिला डॉक्टर मृत्यू[प्रकरणातील सहभाग समोर आल्यानंतर गोपाळ बदनेला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. मात्र आता त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

फलटण पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गोपाळ बदनेला सेवेतून बडतर्फ केले आहे. बदने सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस दलाची प्रतिमा मालिन केल्याचा ठपका ठेवत त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group