भाजप आमदाराच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; दोघं ठार
भाजप आमदाराच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; दोघं ठार
img
दैनिक भ्रमर
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोनजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बिदाल-शेरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. दुर्घटनेत स्कुटीवरील दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

वृत्तानुसार, आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडी दहिवडीनजीकच्या शेरेवाडी फाटा येथून जात असताना एका स्कूटीला जोरदार धडक दिली. यामध्ये ३० वर्षीय विवाहित रणजीत मगर आणि २५ वर्षीय अनिकेत मगर यांचा मृत्यू झाला आहे. अनिकेत व रणजीत दोघेही शेरेवाडी फाट्याहून बिदालच्या दिशेने स्कुटीवरुन निघाले होते. यादरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ देखील भरधाव वेगात दहिवडीच्या दिशेने जात होती.

यावेळी शेरेवाडी फाटा येथे स्कार्पिओ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. त्यावेळी समोरून स्कुटीवरून येणाऱ्या रणजीत व अनिकेतला चिरडून स्कॉर्पिओ ५० मीटर अंतरावर पुढे गेली. यामध्ये अनिकेत व रणजीत दोघे गंभीर जखमी झाले. एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, माझा दौरा सुरू होता. माझी गाडी गावात पोहचली होती. एक गाडी मागे होती.. ती गाडी माझ्या ताफ्यासोबत नव्हती. पण मी निघून गेल्यावर हा अपघात झाला. त्या गाडीत माझी लोकं होती. त्यामुळे या प्रकरणात जी असेल ती पोलीस कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group