फलटणमधील मृत महिला डॉक्टरचा हॉटेलमधील पहिला CCTV व्हिडिओ समोर, दरवाजा उघडताना...
फलटणमधील मृत महिला डॉक्टरचा हॉटेलमधील पहिला CCTV व्हिडिओ समोर, दरवाजा उघडताना...
img
वैष्णवी सांगळे
साताऱ्यामधील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात चांगलीच खळबळ उडवली आहे. महिला डॉक्टरने हॉटेल रुममध्ये आत्महत्या केली की तिची हत्या झाली असा प्रश्न तिच्या कुटुंबीयांपासून ते अनेक नेत्यांनी उपस्थित होत आहे. याचदरम्यान आता डॉक्टर तरुणीने ज्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्हीमध्ये मयत डॉक्टर तरुणी एन्ट्री करत हॉटेलच्या रुममध्ये जाताना दिसत आहे. 



तरुणीच्या आत्महत्यावरून अनेक जण संशयाच्या भोवऱ्यात असताना आज हॉटेल मालकाने स्वत: सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मयत डॉक्टर तरुणी हॉटेलच्या रजिस्टरमध्ये आपलं नाव लिहिताना दिसत आहे. नाव लिहिल्यानंतर तरुणी हॉटेलमधील रुमची चावी घेऊन जाते. याठिकाणी दरवाजा उघडताना डॉक्टर तरुणीला काहीतरी प्रॉब्लेम येतो. खोलीचा दरवाजा उघडण्याचा दोन-तीनवेळा प्रयत्न केल्यानंतर अखेर दरवाजा उघडतो आणि तरुणी खोलीत प्रवेश करते. यानंतरच मयत डॉक्टर तरुणी हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या करते.


पत्रकार परिषद घेऊन मधुदीप हॉटेलचे मालक दिलीप भोसले यांनी आपली बाजू स्पष्ट केली. या प्रकरणात आमच्या हॉटेलला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. सुरुवातीला पोलिसांना ज्यावेळेस पोलिसांना बोलावले त्यावेळी पोलिसांनी यायला उशीर होत असल्यामुळे आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन रुम उघडली. त्यानंतर पोलिसांना पाचरण केले असता पोलीस लगेच आले. ही हत्या नाही तर आत्महत्या आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. 
Satara |
इतर बातम्या
Join Whatsapp Group