सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा, यासाठी अनेकजण न्यायाधीशांकडे न्यायाची याचना करतात. मात्र न्याय देणाऱ्या न्यायाधीशांनीच लाच मागितल्याची घटना साताऱ्यात घडलीय.
जामीन देण्यासाठी न्यायाधीशांनी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याची बाब उघडकीस आलीय. याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी करवाई करत सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांवर गुन्हा दाखल केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार , न्यायाधीशांना अटक करण्यासाठी उच्च न्यायालयाला पत्र पाठवण्यात आले असून हायकोर्टाच्या आदेशानंतरच न्यायाधीशांना अटक केली जाणार आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधिश यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी वडिलांच्या जामिनासाठी अर्ज केला होता. त्याची सुनावणी निकम यांच्या न्यायालयात प्रलंबित होती. तो जामीन अर्ज मंजूर करून तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी निकम यांच्या सांगण्याप्रमाणे 2 खासगी इस्मानी तक्रारदाराकडे 5 लाख रुपयांची लाच मागितली.
याप्रकरणी पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.