आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, कोणाला किती जागांची अपेक्षा आहे याबाबत एकएक अपडेट्स समोर येत आहेत. अशातच महायुतीमध्ये असलेल्या आरपीआय पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला ८ ते १० जागा मिळाव्यात अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले यांनी साताऱ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना जागावाटपाबाबत मोठं विधान केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपामध्ये आरपीआय पक्षाला ८ ते १० जागा मिळाव्यात.', अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. तसंच, 'राज्यात महायुतीचा १७० च्या पुढे जागा निवडून येतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलीय.
राज्यात महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तर आम्हाला गृहीत धरू नका. असा इशारा देखील रामदास आठवले यांनी महायुतीला दिला आहे. दरम्यान मी ज्यांच्यासोबत असतो त्यांचे सरकार येते. अशी मिश्किल टिप्पणी देखील रामदास आठवले यांनी यावेळी केली.