उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहे.काही दिवसांपूर्वीच शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे महायुतीतील निधीवाटपावरुन तक्रार केल्याची चर्चा होती.अशातच आता एकनाथ शिंदे यांनी अचानक त्यांचं मूळ दरेगाव गाठलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते नाराज असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील दरेगावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांसाठी मुक्कामी असणार आहेत. मुंबईहून हेलिकॉप्टरद्वारे बुधवारी(ता.16) पाच वाजता दरे येथे दाखल झाले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी लता शिंदे याही आहेत.
एका घरगुती कार्यक्रमासह ग्रामदैवताची पूजा करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा हा दौरा असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे नाराज असल्यानंतर दरे गावी येत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात एकीकडे राजकीय घडामोडींना एवढा वेग आला असताना कामाच्या व्यापातून शिंदे हे त्यांच्या दरेगावी मुक्कामासाठी पोहोचले आहेत.पण त्यांचा हा खासगी दौरा असल्याची माहिती समोर येत आहे.
अमरावती विमानतळ उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले. तिथून ते थेट आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी रवाना झाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील मूळ गाव दरेगाव या ठिकाणी 3 दिवसांसाठी मुक्कामी आले आहेत. पाच वाजता मुंबईवरुन ते हेलिकॉप्टरने थेट त्यांचे गाव दरे येथे दाखल झालेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी देखील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , आज एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने ते दिवसभर गावी असणार आहेत. 18 तारखेला ग्रामदैवत येथे त्यांच्या हस्ते पूजा ठेवण्यात आलेली आहे. दरम्यान अचानक एकनाथ शिंदे तीन दिवस मुक्कामासाठी दरे गावी आल्याने सध्या राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.