नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराची आज सांगता होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निवडणुकीसाठी दौरे करून प्रचार केल्याने नाशिकची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. तर विवेक कोल्हे हे अपक्ष निवडणूक लढवत आहे. नाशिकच्या चौरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कोण मारणार बाजी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामुळे नाशिकची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हानिहाय मतदार संख्या
नंदुरबार :- 5 हजार 393
धुळे :- 8 हजार 159
जळगाव :- 13 हजार 122
अहमदनगर :- 17 हजार 392
नाशिक :- 25 हजार 302
एकूण मतदार :- 69 हजार 368