धक्कादायक घटना.... कोयत्याची दहशत; जीव वाचविणाऱ्या डॉक्टरनेच केला तरुणावर  हल्ला
धक्कादायक घटना.... कोयत्याची दहशत; जीव वाचविणाऱ्या डॉक्टरनेच केला तरुणावर हल्ला
img
DB
पुण्यामध्ये  कोयत्याची दहशत कायम असून पुण्यात कोयता गँगमुळे नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. यातच आता एका डॉक्टरने तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वाघोलीत एका डॉक्टरने तरूणावर कोयत्याने हल्ला केला आहे.



डॉक्टरांकडून तरुणाने व्याजाने घेतलेले पैसे वेळेत परत न केल्याने डॉक्टरसह गुंडांनी मिळून तरुणावर कोयत्याने वार केला. जीवन रक्षक दवाखान्याचे डॉक्टर आणि त्याच्या इतर दोन साथीदार गुंड्यांनी मिळून तरूणावर जीवघेणा हल्ला केला.



काय आहे हे प्रकरण?

जीवन रक्षक हॉस्पिटलचा डॉक्टर विवेक गुप्ता आणि त्याच्या इतर दोन साथीदार गुंडांनी कोयत्याने प्रितेश बाफना यांच्यावर हल्ला केला.  डॉक्टर विवेक गुप्ता याच्याकडून प्रितेश बाफना यांनी व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे वेळेत परत न दिल्याने डॉक्टर विवेक गुप्ता आणि गुंडांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रितेश बाफना जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पुण्यातील वाघोली येथील लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात एका डॉक्टरने कोयत्याने केलेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. डॉक्टर लोकांचा जीव वाचवून त्यांना वरदान देतात. इथे एका डॉक्टरनेच एका जीवाचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group