हिंगोली जिल्ह्यातील पळशी येथील रहिवासी असलेल्या एका महिलेवर हिंगोली शहरातील एका खाजगी रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर या महिलेच्या जीवाला असलेला धोका टळला आहे. ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी मोकळा श्वास घेत डॉक्टरांचे आभार मानले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोलीमध्ये शेतकरी महिलेच्या पोटातून ७ किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे. हिंगोली शहरातील एका खाजगी रुग्णालयात या महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. दरम्यान मागील पाच वर्षापासून या महिलेला हा त्रास सुरू असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील पळशी येथील त्या रहिवासी आहेत.
या महिलेला मागील काही महिन्यांपासून पोटात दुखत असल्याचं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं. त्यांची प्राथमिक तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना सिटीस्कॅन व एमआरआय सारख्या तपासण्या करण्यास सांगितल्या. मात्र तपासणीमध्ये डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून डॉक्टरही चक्रावले. कारण या महिलेच्या पोटात तब्बल साडेसात किलोचा अनावश्यक गोळा तयार झाला होता.
दैनंदिन व्यायाम नसल्याने व जेवणाच्या वेळा योग्य नसल्याने आपलं पोट पुढे आलं असा समाज या महिलेचा होता. मात्र तपासणीमध्ये रिपोर्ट भलताच आल्याने या महिलेसह कुटुंब देखील चिंतेत सापडलं. या महिलेच्या पोटात असलेला गोळा हा त्यांच्या जीवितवाला धोका निर्माण करणारा असल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
आज सकाळी सात वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याने विशेष तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध करण्यात आली होती. अखेर तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर या महिलेच्या जीवाला असलेला धोका टळला आहे. डॉक्टरांनी तब्बल साडेसात किलोचा गोळा या महिलेच्या शरीराबाहेर काढला आहे.