नाशिक येथे नवीनच सुरू झालेल्या बॉर्नीओ माता आणि बाल रुग्णालय येथे उत्तर महाराष्ट्रातील पहिली अंडरवॉटर डिलिव्हरी म्हणजेच पाण्याखालील बाळंतपण दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी डॉ. श्रद्धा सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. गर्भवती महिला सौ. संध्या गायकवाड या प्रसूतीसाठी दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी बॉर्नीओ माता आणि बाल रुग्णालय नाशिक येथे दाखल झाल्या. प्रसूतीपूर्व वेदना असल्याने त्यांना तत्काळ लेबर रूम मध्ये हलविण्यात आले.
बॉर्नीओ रुग्णालयात नॉर्मल / नॅच्युरल प्रसूती साठी प्राधान्य दिले जाते, नॅच्युरल प्रसूती म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या गर्भवतीची घरात प्रसूती होते व तिला कुठल्याही औषधांची गरज पडत नाही तशाच पद्धतीची प्रसूती पण ती वेदनारहित व सुरक्षित व्हावी यासाठी बॉर्नीओ रुग्णालयात सुसज्ज असे LDRP (लेबर डेलिव्हरी रिकव्हरी आणि पोस्ट नेटल केअर) रूम सूट उभे करण्यात आलेले आहेत.
ज्यामध्ये गर्भवतीची प्रसूती व प्रसूतिनंतरची काळजी त्याच रूम मध्ये घेतली जाते व तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविले जात नाही. जेणेकरून तिला परिवरासोबत घरी असल्याचा अनुभव येतो. LDRP सूट मध्येच पाण्याखालील प्रसूतीसाठी अत्याधुनिक अशा बरदिंग टब ची व्यवस्था बॉर्नीओ रुग्णालयात आहे. सदरील गर्भवती सौ. संध्या हिस डॉक्टरांनी पाण्याखालील प्रसूतिविषयी व त्याच्या विलक्षण फायद्यांविषयी समजावून सांगितले, आणि नातेवाईक आणि गर्भवतीच्या संमती नंतर तिला बरदिंग टब मध्ये प्रसूतीसाठी हलविले. यानंतर दुपारी ३.११ मिनिटांनी बाळाचा जन्म झाला. आता आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत.
या प्रसंगी बोलताना डॉ श्रद्धा सबनीस यांनी असे सांगितले कि लेबर रूम मधील प्रसूती आणि पाण्याखालील प्रसूती यातील मोठा फरक लक्षात घेतला तर पाण्याखालील प्रसूती ही आईसाठी अत्यंत आरामदायी आहे. या प्रसुतीदरम्यान पाण्याच्या तापमानाचे सतत निरीक्षण केले जाते. या गरम पाण्यामुळे आईच्या सांध्यावर आणि स्नायूवर दबाव येत नाही. तसेच पाण्याच्या स्पर्शाने मानसिक ताणही कमी होतो, प्रसूतिच्या वेदनांचा प्रभाव ही कमी होतो आणि प्रसूती अतिशय सोप्यापद्धतीने पार पडते.
या प्रसूतीसाठी बॉर्नीओच्या ऑपरेशन थिएटर मधील सर्व स्टाफ, डॉक्टर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अवघ्या २ महिन्या आधी सुरु झालेले बोर्निओ हॉस्पिटल हे एकूण ५० खाटांचे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त आहे. यातील २४ खाटा NICU (नवजात शिशु विभाग), ७ खाटा PICU, २ ऑपरेशन थिएटर, ३ LDRP रूम, Suite रूम, सुपर डीलक्स व डीलक्स रूम आणि २४*७ काळजी घेणारी तज्ज्ञयानंची टीम आहे.
बॉर्नीओचे चेअरमन आणि मॅनिजिंग डायरेक्टर डॉ. संतोष मद्रेवार म्हणाले "आपल्या जीवनात नवा जीव येणे हा एक अद्वितीय अनुभव आहे. बॉर्नीओ माता आणि बाल रुग्णालयाच्या संकल्पनेने हा प्रवास सुरक्षित त्याच्याबरोबर आपल्याला सुखाच्या आणि सामान्य प्रसूतीचा आनंद देणारा असावा असा आमचा प्रयत्न आहे. आमच्या विशेषज्ञ टीमच्या समर्थनाने प्रत्येक पावलावर आपल्याला सुरक्षित वाटावे, आणि सामान्य प्रसूतीचा आनंद घेता यावा यासाठीच्या सर्व सोई सुविधा आम्ही या हॉस्पिटलमध्ये पुरवीत आहोत.
आपली आणि आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी आमचे शीर्षप्राधान्य आहे. सदैव स्मरणात राहणाऱ्या या अनुभूतीसाठी तुम्ही बोर्निओ हॉस्पिटलवर विश्वास ठेवून हा अनुभव चिरकाल जपावा हेच आमचे ध्येय आहे.