खळबळजनक : माजी सरपंचावर तहसील कार्यालयासमोरच कोयत्यानं सपासप वार
खळबळजनक : माजी सरपंचावर तहसील कार्यालयासमोरच कोयत्यानं सपासप वार
img
Dipali Ghadwaje
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी सरपंचावर धारदार कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की , ही घटना हिंगोलीतल्या कळमनुरीमध्ये घडली आहे.  विजय नरवाडे असं या माजी सरपंचांचं नाव आहे. जमिनीच्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात नरवाडे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात दोन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर आणखी एक हल्लेखोराचा शोध सुरू आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू  आहे.

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group