नागरिकांनो सावधान! नाशिकमध्ये डेंग्यू पाठोपाठ स्वाईन फ्लूचा बळी
नागरिकांनो सावधान! नाशिकमध्ये डेंग्यू पाठोपाठ स्वाईन फ्लूचा बळी
img
Dipali Ghadwaje
नाशिक :  पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नाशिकमध्ये डेंग्यूची साथ सुरु आहे. नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर सुरु असतानाच आता त्या पाठोपाठ स्वाईन फ्लूने बाधित रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून 31 जणांना लागण झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये डेंग्यू पाठोपाठ स्वाईन फ्लूचा बळी गेला आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नाशिक शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दरम्यान नाशिकमध्ये रोगराई वाढीस लागल्याने डास उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी औषध आणि धूर फवारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group